अभ्यास कसा करावा ??..🤔
- अभ्यास कसा करावा ? किती करावा ? त्यासाठी काय केल पाहिजे ? असे अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षा करणाऱ्या स्पर्धकांच्या मना मध्ये असतात, आज त्याचाच आढावा आपण घेणार आहोत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मध्ये राज्यसेवा अराजपत्रित दुय्यम ग्रुप बी सी साथी आणि सरळ सेवा ज्यामध्ये पोलिस भरती तलाठी भरती संबंधित सर्व स्पर्धकांचा विचार करून हे लिहीत आहे, त्यातील तुम्ही देत असलेल्या परीक्षे नुसार त्यात बदल करा
- सर्वप्रथम तुम्ही देत असलेली परीक्षा कोणती आहे हे ठरवा. स्पर्धा परीक्षा देतो म्हणजे सर्व देतो ते ठीक, पण कोणत्याही ऐका गटाला प्राथमिकता असली पाहिजे, तुमच ध्येय निश्चित असल की त्या नुसार तयारी होते- मन चलबिचल होत नाही आणि विषयातील अभ्यासात शिष्त येते. सर्व परीक्षेला विषय जरी सारखे असले तरी प्रतेक परीक्षेत प्रतेक विषयाच महत्व हे वेगळ वेगळ आहे. त्यामुळेच नक्की तुम्हाला काय व्हायच आहे ते अगोदर ठरवा. त्यानंतर येते परीक्षेची तयारी,
- कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या यशाच गमक हे शिस्त सातत्य आणि परिश्रम या वर आधारलेल आहे. जो पर्यन्त हे तुमच्या लक्षात येत नाही तो पर्यन्त अभ्यासिकेतील दिवस फक्त सरतो मार्गी लागत नाही, त्यासाठी तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असल पाहिजे.
- बऱ्याच वेळी अस होत की आपण प्रामाणिक आहोत परंतु यश मिळत नाही, त्यावेळी सकारात्मक विचार हा आहे की, ते का मिळत नाही ? माझ नेमक काय चुकत आहे ? याचा शोध घेणे आणि त्यावर काम करणे. इथेच तुमच्या संयमांची कसोटी असते.
- लक्षात घ्या कोणत्याही स्पर्धेमध्ये प्रतेक जन जिंकतोच अस होत नाही, पण कुणीच शिकत नाही अस ही होत नाही, जेव्हा तुम्ही जिंकत नाही तेव्हा तुम्ही शिकलेले असता ( हरलेले असता असा उलेखच मी करणार नाही, कारण स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी एक तर जिंकतो किंवा शिकतो. तो कधीच हारत नाही.)
आता तुमच्या लक्षात आल असेल की थोडक्यात मला काय म्हणायच आहे. तर पाहू स्पर्धा परीक्षा तयारी करताना अभ्यासात शिस्त कशी आणता येईल बाकी सातत्य आणि संयम असूद्या ऐकदिवस यश नक्की तुमच्या जवळ असेल.
सरळ सेवा भरती साठी अभ्यासायचे घटक. 🔜
MPSC Group B & Group C
महत्वाचे पडणारे प्रश्न ते कोणते ??
अभ्यास उजळणी कशी करायची ? रिविजन कधी करायची ? रिविजन कशी करायचे ? रिविजन किती वेळा करायची ?
दिवसभरातील अभ्यासलेले टॉपिक त्यांचे सायंकाळी रात्री रिव्हिजन होणे आवश्यक .
आठवड्याच्या शेवटी देखील आठवडाभरात केलेल्या टॉपिकचे रिविजन करणे आवश्यक,
सोबत त्याच प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवणे महत्त्वाचे .
कोणताही महत्त्वाचा मुद्दा अभ्यासताना त्याच्या नोट्स बाजूला काढणे आवश्यक आणि जर त्या टॉपिक संबंधित एखादी सराव प्रश्नपत्रिका असेल तर ती नक्की सोडवा ..
जुन्या प्रश्नपत्रिका का अभ्यासाव्या ??
कारण त्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की प्रश्न कसे येतात ? कोणत्या घटकावर येतात ? किती येतात ? त्याची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे ? कोणत्या घटकाचे महत्त्वाचे उपघटक कोणते आहेत ? कोणत्या विषयाला किती महत्त्व दिले पाहिजे ? या सर्व गोष्टी कळण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे गरजेचे आहे ..
जुन्या प्रश्नपत्रिका कशी अभ्यासावी ??
प्रश्नपत्रिका पाहताना विषयाचे प्रश्न किती आले आहेत ? त्याचे घटक आणि त्याचे उपघटक आणि त्यासंबंधीत प्रश्न कसा तयार होऊ शकतो हे लक्षात घ्या.
कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना त्याचा चालू घडामोडी शी कसा संबंध येतो, हे बघणं आवश्यक
अभ्यास करताना संवादात्मक स्वरूपात अभ्यास करा. स्वतःला त्यामध्ये इन्व्हॉल करा.
अभ्यास घटक उपघटक अशा प्रकारे करा
विषय ज्ञान
इतिहास + भूगोल = ३० मार्क
अर्थशास्त्र +सामान्य विज्ञान = ३० मार्क
चालू घडामोडी + बुद्धिमत्ता ३० मार्क
राज्यघटना = १०
- एका दिवसात किमान दोन विषयाचे वाचन करणे आवश्यक त्यामध्ये
इतिहास + राज्य घटना
भूगोल + अर्थशास्त्र अश्या प्रकारे विषयाची पकड असावी हे विषय अकमेकांशी संलग्न आहेत. चालू घडामोडी +विज्ञान
जुन्या प्रश्नपत्रिकांना दहा टक्के वेळ द्यादिवसाच्या शेवटी एक सर्व विषयांची प्रश्नपत्रिका सोडवा.त्याचे विश्लेषण करा,घटक समजून घ्या.कोणत्याही विषयाला महत्व हे त्याच्या मार्क नुसार द्या .
100 = चालू घडामोडी + बुद्धिमत्ता 30 मार्क , म्हणजे हे 30 सोडले तर 70 प्रश्न हे आधीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वाचून करू शकता की काय येतील ? कसे येतील ? त्याची पद्धत कशी असेल ? मग त्या घटकांकडे लक्ष द्या.
बाकी वरील ३० प्रश्नांसाठी तुम्हाला सराव करणे आवश्यक आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी रोज अभ्यासा त्याचा सराव करा,
तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्याचा सराव हा सराव पेपर सोडूनच होतो. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा .
खाली सराव प्रश्न पत्रिका यांच्या लिंक आहेत त्याचा वापर करून सराव करा.
माहिती आवडली असल्यास मित्रांसोबत शेअर करा .