अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी ?

अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?

🛑 Combine Prelims साठी भारतीय अर्थव्यवस्थेचे साधारणतः 12 उपघटकांचा अभ्यास करावे लागतात. त्यातील साधारणतः 6 घटकांचा आज आपण आढावा घेऊ.         

❇️ 1.मूलभूत संकल्पना –

यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय? विकसित,विकासनशील, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय?इ. संकल्पना clear करून घ्या.कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये छान दिल्या आहेत. प्रश्न – शक्यतो येत नाही. पण या Topic च्या Concepts clear असल्याशिवाय पुढील अर्थव्यवस्था पण समजत नाही.

❇️ 2. राष्ट्रीय उत्पन्न – खूपच conceptual Topic आहे. यातील प्रत्येक concept जोपर्यत व्यवस्थित समजत नाही तोपर्यत खूप अवघड वाटतो. पण एकदा लक्षात आल की मग यासारखा सोपा घटक नाही. कोळंबे सरांच्या पुस्तकात छान cover केलाय.

प्रश्न – Gdp vs Gnp,  Ndp vs Nnp, Gross vs Net Value Addition etc. संकल्पनावरती प्रश्न विचारला जातं असतो. अणखी Gdp चे base years चांगले करून ठेवा आणि या base years च्याच Gdp, Poverty, unempolyment etc साठी figure करत चला.

❇️ 3.आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना – आर्थिक नियोजनाची पार्शवभूमी, भारतातील पंचवार्षिक योजना त्याचा कालावधी, वृद्धीची उद्दिष्ट्ये, प्रतिमान, Model, योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये चांगली करून ठेवा. योजनेचा कालावधी, पंचवर्षिक योजना राबवत असताना राबविलेल्या महत्वाच्या योजना या बाबी चांगल्या करून ठेवा. हा Topic देसले सरांच्या पुस्तकातून चांगला cover होतो.

❇️ 4.दारिद्र्य व बेरोजगारी – Concepts आणि Facts याच मिश्रण असलेला घटक. दारिद्र्यचे प्रकार, Recall Periods,दारिद्र्य मोजमापच्या समित्या त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यास करावा लागेल.दारिद्र्याच्या figures तोंडपाठ करा. हमखास प्रश्न येतोच. बेरोजगारी मध्ये त्याच्या व्याख्या म्हणजे श्रम शक्ती कार्य शक्ती बेरोजगारीचा दर या व्यवस्थित करून ठेवा. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती पण चांगल्या करायला हव्यात. हा टॉपिक  कोळंबे सर आणि दिसले सरांच्या पुस्तकातून चांगला करा. प्रश्न – साधारणता दारिद्र्याचे प्रकार, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीच्या व्याख्या, दारिद्र्य मापनाच्या समित्या  इ. घटकांवरती नियमित प्रश्न विचारले गेले आहेत.

❇️ 5. लोकसंख्या – यामध्ये लोकसंख्येच्या संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा फॅक्च्युअल डाटा तोंडपाठ करून टाका. उदाहरणार्थ. लिंग गुणोत्तर,साक्षरता, लोकसंख्या वृद्धि, लोकसंख्या घनता इ. अलीकडे आयोग लोकसंख्येच्या धोरणांवरतीदेखील प्रश्न विचारत आहे. त्यामुळे 1976 आणि 20 00 लोकसंख्या धोरण चांगलं करून ठेवा.देसले सर भाग 2 मधून हा टॉपिक चांगला कव्हर होतो.

❇️ 6. Rbi व बँकिंग – यामध्ये आरबीआयची पार्श्वभूमी, कार्य, त्यामध्ये देखील संख्यात्मक व गुणात्मक साधने आणि एकंदरीत भारतीय वित्तव्यवस्थेमध्ये आरबीआयची असलेली भूमिका या घटकांचा बारकाईने अभ्यास करावा. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक वाचले तरी चालेल. प्रश्न – आरबीआयची पार्श्वभूमी आरबीआयचे विविध कायदे उदा 1934 act, 1949 बँकिंग रेगुलशन act यावरती प्रश्न विचारले जातात. ते चांगले करा. Rbi ची संख्यात्मक साधने जसं की CRR, SLR, Repo Rate, Reverse Rapo Rate, Open Market Operations (Omos) etc चांगले करा.

अशा पद्धतीने वरील सहा घटकांची आपण तयारी केली तर Combine Exam मध्ये आपल्याला या घटकांमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील.

 येणाऱ्या परीक्षांसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐

Aniket Thorat ( STI ASO 2019 )

Scroll to Top