आरोग्य भरती संपूर्ण मार्गदर्शन 👨‍⚕️

परिक्षार्थी  मित्रांनो आरोग्य भरती संबंधित महत्वाची महिती आणि नेहमीचे पडणारे प्रश्न आपन पाहणार आहोत.  

  • मित्रांनो आरोग्य विभाग भरती ही जिल्हा परिषद अंतर्गत होते, त्यामध्ये,आरोग्य सेवक / सेविका, आरोग्य पर्यवेक्षक , औषध निर्माता, प्रयोगशाळा सेवक / सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे पद असतात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज दिलेल्या मूदतीत सादर करावा लागतो. परीक्षेमध्ये चार मुख्य विषय असतात.. मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान.  
  • ( काही पदांसाठी तांत्रिक विषय २५ गुणांचा असतो तो आपण पुढे पाहू  )
  • प्रत्येक विषय हा 25 गुणांसाठी असतो.. वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी परीक्षा असते. काही वेळा तांत्रिक हा घटक मध्ये जोडल्या जातो, त्यावेळेस २० किंवा २५ प्रश्न तांत्रिक प्रश्न असतात म्हणजेच ज्या पदासाठी आपण अर्ज करत आहोत त्या पदा समबंधीत माहितीचे प्रश्न असतात. 
  • बाकी_ मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान प्रत्येकी २० – २५ गुणांचा असतो. 
  • ही सरळ सेवा पद्धतीची परीक्षा असल्याकारणाने एकच परीक्षा होते व त्यानंतर निकाल. कागदपत्र तपासणी,  प्रशिक्षण, आणि  प्रशिक्षणानंतर रुजू होता येतं. 
  • कामाचे ठिकाण – जिल्हा किंवा विभागीय रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी काम असत. कामच स्वरूप तुम्ही निवडलेल्या पदानुसार असत .   

आरोग्य विभागातील ही पद वर्ग तीन मधील गट क आणि गट ड मधील असतात. 📌

 

जाहिरात पाहताना बघायच्या मुख्य गोष्टी पुढील प्रमाणे .. 

  1.  पद संख्या – १००००  जागा ( जाहिरात मध्ये असतील तेवढे पद ) 
  2.  शैक्षणिक पात्रता – 12th Pass ( मूळ जाहिरात नेहमी वाचावी काही पद १० पास वर असतात )
  3.  वयोमर्यादा – खुला वर्ग:- 18 ते ३८ वर्षे  
  4.  अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: रु. 450 /- मागास प्रवर्ग: रु. 350 /-( कंपनीने ठरवलेली असेल तेवढा शुल्क )
  5.  अर्ज पद्धती – ऑनलाइन
  6.  परीक्षा पद्धत – ऑनलाइन ( काही परीक्षा लेखी होतात )

अर्जा संबंधीत सर्वसाधारण सूचना 

  • आरोग्य भरती चे अधिकृत पोर्टल त्या वेळी उपलब्ध असते त्या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी ( link ) दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.
  • उमेदवार एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरू शकतो परंतु वेगवेगळी पद हवी कारण एकाच पदाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शक्यतो ऐकाच दिवशी होते. उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे ( सूचना पत्रक व्यवस्तीत वाचने / जाहिरात तपासणे  )
  • परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल ? ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन भरणा – पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरणा करू शकता.
  • अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. तर तुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.
  • आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. अर्ज शुल्क परत मिळेल काय तर याच उत्तर नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळत  नाही. ( सूचना पत्रक व्यवस्तीत वाचने )
  • ज्या पदासाठी अर्ज केला आहे , त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी तुम्ही त्याच पोर्टल वर सर्वात खाली त्या संबंधित काही मेलआयडी आणि नंबर असतात त्या  ठिकाणी संपर्क साधावा .
  • पासवर्ड विसरला असाल तर मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा सादर करा व त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल त्यावर क्लिक करा. 
  • चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास त्यात बदल करता येतो परंतु असे होऊ नये म्हणून काळजी घ्या कारण कंपनीने त्या वेळी घेतलेल्या निर्णयावर ते अवलंबून असत . 

भरती संदर्भात महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे . 

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता यामध्ये गट ड मधील असेल तर दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असतं.. गट-क मधील परीक्षा असेल तर बारावी उत्तीर्ण आवश्यक असतं.. यामध्ये तुमचा दहावी मध्ये विज्ञान हा विषय असन अत्यंत आवश्यक असत,  त्यानंतर बहुउद्देशीय बारा महिन्यांचा मूलभूत कोर्स पूर्ण झालेला असणं आवश्यक असतं जरी नसेल तर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो पूर्ण करू शकता. 

 परीक्षा पद्धत –  आरोग्य सेवक आणि सेविका यांची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची असते. आरोग्य विभागा अंतर्गत परीक्षा घेण्यासाठी कोणत्यातरी  एका कंपनीला कंत्राट दिलेल असतं..त्या अंतर्गत या सर्व परीक्षा होतात.. त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा असतो आणि त्यासाठी त्या कंपनीने नमूद केलेली रक्कम आपल्याला ऑनलाइन स्वरूपात भरायची असते ..

 वय मर्यादा –  वय मर्यादा 18 ते 38 पर्यंत असते प्रत्येक प्रवर्गानुसार ही मर्यादा कमी जास्त होऊ शकते त्यासाठी मुख्य जाहिरात तपासावी. ( खाली उदाहरण म्हणून मागची जाहिरात दिलेली आहे ती पाहून घ्या.  )

 पगार –  आरोग्य विभाग अंतर्गत होणाऱ्या पद भरतीसाठी गट-क आणि गट- ड मधील  उमेदवारांना  सातव्या वेतन आयोगानुसार 18 ते 23 हजार रुपये      वेतन मिळतं . 

कागदपत्रे –

  • दहावी – बारावी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट. 
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 
  • सहा महिन्याच्या आतील फोटो . फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची असते . 
  • त्याची साईज ५० KB पर्यंत असने आवश्यक आहे .
  • जात प्रमाणपत्र.
  • MS- CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र. 
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र. 
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र ( ews )
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाचे प्रमाणपत्र. 

विषय ज्ञान –

विषय – मराठी      इंग्रजी     गणित व बुद्धिमत्ता    सामान्य ज्ञान    तांत्रिक प्रश्न       वेळ 

गुण  – २५ /१५      २५ / १५       २५ / १५             २५ / १५             ४०            ९० मिनिट 

जाहिरात पाहताना बघायच्या मुख्य गोष्टी पुढील प्रमाणे .. 

याठिकाणी लक्षात घ्या २०२० पूर्वीच्या पेपर मध्ये मराठी इंगजी गणित आणि सामान्य ज्ञान असे मिळून प्रश्न ७५ असायचे आणि तांत्रिक २५ प्रश्न परंतु २०२१ आणि २०२२ मधील काही जिल्ह्यांमधील पेपर मध्ये तांत्रिक प्रश्न हे सामान्य ज्ञान घटकामद्धे आले होते त्यामुळे. जाहिरात येते तेव्हा त्यामध्ये नमूद असेल त्या प्रमाणे अभ्यास करावा 📌

 सर्वसाधारण सांगायचे झाल्यास आरोग्य विभागाचा पेपर असल्या कारणाने सामान्य विज्ञान मधील आरोग्य शास्त्र संबंधित प्रश्न असतातच त्यामुळे तो भाग वगळू नका , त्या भागाचा समावेश अभ्यासात असू द्या . 📌

गट क प्रवर्गातील सरळ सेवा परीक्षा असल्या कारणाने जास्त खोलवर अभ्यास करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे प्राथमिक अभ्यासाला महत्व द्या . मागील प्रश्न पत्रिका तपासा( साईट वर उपलब्ध आहेत )  म्हणजे पेपर कसा असतो याचा अंदाज येईल. 📌

 

Disclaimar 

लक्षात घ्या ही माहिती केवळ भरती संदर्भातील माहिती मिळावी आणि  आरोग्य विभाग भरती संबंधित ओळख निर्माण व्हावी या उदेशाने लिहिली गेली आहे, त्यामुळे ही माहिती अधिकृत समजू नये, आरोग्य विभाग भरतीची जाहिरात येते तेव्हा संपूर्ण जाहिरात आणि त्या सोबत सूचना पत्र देखील असत तेच अधिकृत असत त्यामध्ये वेळोवेळी बदल झालेल्या सूचनांचा समावेश असतो. त्यामुळे तीच माहिती अधिकृत समजावी 

 

सोबत मागची जाहिरात जोडत आहे. म्हणजे तुम्हाला जाहिरात कशी असते याची माहिती होईल. आणि वेबसाइट वर मागच्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि सराव पेपर आहेत त्याचा सुद्धा उपयोग करा. 

                                                                                         

📌 महत्वाची काही State Board पुस्तके उपलब्ध आहेत . ते पुढील प्रमाणे –                       

📌Telegram  ग्रुप ला  जॉइन व्हा –                                                                              

📌 Youtube chanel  ला भेट द्या  –                                                                            

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती संपूर्ण मार्गदर्शन      

🎯 पोलिस भरती संपूर्ण मार्गदर्श      

🎯 आरोग्य भरती संपूर्ण मार्गदर्श     

🎯 ग्रामसेवक भरती संपूर्ण मार्गदर्श 

🎯 राज्यसेवा  संपूर्ण मार्गदर्शन          

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती सराव पेपर       

🎯 पोलिस भरती सराव पेपर       

🎯 आरोग्य भरती सराव पेपर      

🎯 ग्रामसेवक भरती सराव पेपर   

🎯 राज्यसेवा सराव पेपर            

Scroll to Top