भारताचा / महाराष्ट्राचा इतिहास.
कमी वेळात जास्त सराव करण्यासाठी उपयुक्त... 🙋🏻
जाहिरात / Advertisment
१) इतिहास घटकाचा अभ्यास करताना ( खालील सविस्तर गोष्टी वाचा ) उठाव / कॉँग्रेस अधिवेशने / समाज सुधारक अश्या घटकांवर सरळ सेवेला प्रश्न विचारले जातात.
२) इतिहास अभ्यास घटक आवाका मोठा असला तरी काही ट्रिकचा वापर करून हा विषय आपल्याला सोप्या पद्धतीने हाताळता येऊ शकतो. त्याच ट्रिक ऑन लाईनर स्वरूपात या ईबुक मध्ये देण्यात आल्या आहेत.
३) महत्वाच्या वन- लाईनर स्वरूपात या मध्ये इतिहास विषय घेण्यात आला आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे. आणि त्यासाठी या इबुक चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
"इतिहास" .. ⛳
इतिहास या घटकाचा अभ्यास करताना मित्रांनो हे लक्षात घ्या . इतिहासाचे मुख्य तीन प्रकार ( भाग ) पडतात प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास , आणि या मध्ये अत्यंत महत्वाचे म्हणजे याचा उपयोग आपल्याला आपण देत असलेल्या परीक्षे प्रमाणे करता आला पाहिजे ..
प्रत्येक विषयाची व्याप्ती ही परीक्षेनुसार बदलत असते ते तुमच्या लक्षात आल पाहीजे. कोणत्याही विषयाच सखोल ज्ञान मिळाव हा अट्टहास परिक्षारथी चा नसावा तर परीक्षेला जे येईल त्याच दृष्टीने अभ्यास करावा जेणेकरून आपण या स्पर्धा पसरीक्षेच्या गर्दीतून लवकर बाहेर निघून स्वत: का सिद्ध करू शकू आणि त्याच दृष्टीने ठराव पण महत्वाचे मुद्दे मी इथे स्पष्ट केले आहेत ..
🔶 राज्यसेवा – महत्वाचे मुद्दे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या व्यक्तींची भूमीला, समाज सुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, ब्रिटिश सत्तेची स्थापना व त्यांची नीती उद्दिष्टे, १८५७ चा उठाव, कॉँग्रेस स्थापना व त्यांनी घेतलेली भूमिका, गांधी युग .. ( आता या मध्ये जे वरती ३ मुद्दे सांगितले त्या वर आधारित राजयसेवा परीक्षेला प्रश्न असतात त्याच खाली स्पष्टीकरण दिल आहे, आणि त्यातील मुद्याची परत फोड करता येईल जेव्हा तुम्ही वेगवेगळी पुस्तक हाताळता जुन्या प्रश्नपत्रिका पाहता त्यातील घटक तुमच्या लक्षात येत जातील तेव्हा कोणत्या घटकाला किती महत्व द्यायच हे एकदा लक्षात आल की विषयाची पकड मजबूत होते व त्या सोबत सराव प्रश्न पत्रिका सोडवल्या की वेळेच नियोजन देखील होत.
🔶 ग्रुप बी – सी, – या मध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे आधुनिक भारत,१५५७ चा उठाव, कॉँग्रेसची स्थापना, उठाव, समाज सुधारक, टिळक युग-गांधी युग, या घटकांवर जास्त प्रश्न असतात. प्राचीन भारत या मध्ये येत नाही, वनलाईनर पद्धतीने याचा अभ्यास करावा, जास्त खोलात न जाता मुद्दा काय आहे ? त्याच कारण काय ? कोनांभोवती फिरतो ? आणि त्या संबंधित घटक. या चार गोष्टी लक्षात ठेऊन या परीक्षेचा अभ्यास करावा.
🔶 सरळसेवा – या परीक्षेचा अभ्यास करताना ऐक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की मराठी इंग्रजी गणित आणि सामान्य ज्ञान या ४ विषयामद्धे मिळून १०० प्रश्नांची परीक्षा आहेत प्रश्न प्रतेक विषयाला २५ असतात त्या मध्ये सामान्य ज्ञान या घटका मद्धे , इतिहास, भूगोल, नागरीकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, अश्या पद्धतीने प्रश्न वितरित होतात मग त्यामध्ये ऐका विषयाला सरासरी २ ३ प्रश्न असतात . मग त्यामध्ये कोणत्या मुख्य घटकांचा अभ्यास करावा हे सांगण कठीण आहे परंतु समाज सुधारक, राष्ट्रीय कॉँग्रेस, प्राचीन भारत ncrt नुसार हे काही महत्वाचे घेतक सांगता येतील. बाकी प्रश्न पद्धत ही तुम्हाला तुम्ही देत असलेल्या परीक्षेच्या मागच्या प्रश्न पत्रिकेचा अभ्यास केला की लक्षात येईल .
➡️ खाली काही महत्वाच्या घटक pdf स्वरूपात देत आहे त्याचा उपयोग नक्की होईल आणि संबंधित जुन्या प्रश्नपत्रिका आणि सराव प्रश्न पत्रिका टेलेग्राम ग्रुप मध्ये मिळतील. ( जॉइन टेलिग्राम )