ग्रामसेवक भरती संपूर्ण मार्गदर्शन
परिक्षार्थी मित्रांनो ग्रामसेवक पदभरती संबंधित महत्वाची महिती आणि नेहमीचे पडणारे प्रश्न आपन पाहणार आहोत. 📌
🔺 मित्रांनो ग्रामसेवक पद भरती ही जिल्हा परिषद अंतर्गत होते,-ग्रामसेवक पद हे वर्ग 3 मधील गट क संवर्गातील पद आहे.. ग्रामसेवक हा ग्राम सभेचा सचिव असतो. ग्रामसेवक हा गटविकास अधिकारी यांच्या अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत काम करतो. ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा परिषदेच अंतर्गत दिले जाते, ग्रामसेवक पदाची निवड ही जिल्हा नियोजन मंडळ किंवा जिल्हा परिषद यांच्या अधिकाराखाली होते आणि परीक्षा त्यांनी अधिकृत केलेल्या कंपनी अंतर्गत होते किंवा जिल्हा परिषद स्वत परीक्षेचे नियोजन करते.
🔺 एक गोष्ट लक्षात घ्या जर का ग्रामसेवक पदभरती परीक्षा जिल्हा परिषदे अंतर्गत झाली तर त्या मध्ये त्या जिल्हया संबंधित प्रश्न येण्याची दाट शक्यता असते आणि जर परीक्षा त्यांनी सुपूर्त केलेल्या कंपनी ने घेतली तर ही शक्यता कमी होते परंतु नाकारता येत नाही. त्या मुळे संबंधित जिल्हा प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न यावर लक्ष पूर्वक अभ्यास करणे गरजेचे राहील.
🔺 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता. प्रत्येक विषय हा १५ गुणांसाठी असतो..कृषि / तांत्रिक हा घटक मध्ये ४० प्रश्न ८० गुणांसाठी येतो.त्या तांत्रिक प्रश्न मुख्य घटक – महाराष्ट्रातील प्रमुख पिक, उत्पादन, मृदा संवर्धन, फळे व भाजीपाला, पशू संवर्धन, पर्यावरण कृषि क्रांति.
या संबंधित प्राथमिक अभ्यास. सोबत राज्यघटना/पंचायत राज घटक सुद्धा महत्वाचा आहे. 📌
बाकी_ मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान प्रत्येकी १५ गुणांचा असतो.
🔺 वेळ ९० मिनिटांची असते ( मुख्य जाहिरात पहावी ) 🔺
🔺 ही सरळ सेवा पद्धतीची परीक्षा असल्याकारणाने एकच परीक्षा होते व त्यानंतर निकाल. कागदपत्र तपासणी, प्रशिक्षण,आणि प्रशिक्षणानंतर रुजू होता येतं.
🔺 कामाचे ठिकाण स्वरूप – ग्राम स्तरावरील ग्राम पंचायत. – जन्म मृत्यूची नोंद करणे/ दिवाबत्तीची सोय करणे / सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची ग्राम स्तरावर अंमलबजावणी करणे. ग्रामसभेला ग्राम सभेचा सचिव या नात्याने उपस्थित राहणे या जबाबदा ऱ्या पार पाडाव्या लागतात .
ग्रामसेवक हे पद जिल्हा परिषदेतील वर्ग – तीन मधील गट – क मध्ये येत. 📌
जाहिरात पाहताना बघायच्या मुख्य गोष्टी पुढील प्रमाणे ..
- पद संख्या – १०००० जागा ( जाहिरात मध्ये असतील तेवढे पद )
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass ६० % ( मूळ जाहिरात नेहमी वाचावी पदवी असेल तरी सुद्धा चालते )
- वयोमर्यादा – खुला वर्ग:- 18 ते ३८ वर्षे ( आरक्षण ३ वर्ष सुट )
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: रु. 450 /- मागास प्रवर्ग: रु. 350 /-( कंपनीने ठरवलेली असेल तेवढा शुल्क )
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- परीक्षा पद्धत – ऑनलाइन ( मागची लेखी झालेली होती परंतु आता ऑनलाइन होईल )
अर्जा संबंधीत सर्वसाधारण सूचना /
- ग्रामसेवक अर्ज भरतीचे अधिकृत पोर्टल त्या वेळी उपलब्ध असते त्या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी ( link ) दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.
- उमेदवार एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरू शकतो परंतु प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे आणि जर परीक्षा एकाच दिवशी होणार असेल तर एकाच ठिकाणी अर्ज करावा. त्यामुळे तुमचे पैसे वाचतील. ( सूचना पत्रक व्यवस्तीत वाचने / जाहिरात तपासणे )
- अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. तर तुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.
- आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. अर्ज शुल्क परत मिळेल काय तर याच उत्तर नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळत नाही. ( सूचना पत्रक व्यवस्तीत वाचने )
- ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी तुम्ही त्याच पोर्टल वर सर्वात खाली त्या संबंधित काही मेलआयडी आणि नंबर असतात त्या ठिकाणी संपर्क साधावा.
- पासवर्ड विसरला असाल तर मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा सादर करा व त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल त्यावर क्लिक करा.
- चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास त्यात बदल करता येतो परंतु असे होऊ नये म्हणून काळजी घ्या कारण कंपनीने त्या वेळी घेतलेल्या निर्णयावर ते अवलंबून असत .
भरती संदर्भात महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे .
- शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता यामध्ये बारावी ६० % गुणांसह पास असणे आवश्यक आहे . जर उमेदवाराला तेवढे गुण नसतील तर पदवी वर अर्ज करता येतो. कृषि पदवी देखील चालते. अर्ज भरण्या पूर्वी जाहिरात नक्की वाचा. सरकारी निर्देश वेळोवेळी बदललेली असतात.
- पद्धत – ग्रामसेवक अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची असते जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत परीक्षा घेण्यासाठी कोणत्यातरी एका कंपनीला कंत्राट दिलेल असतं..त्या अंतर्गत या सर्व परीक्षा होतात.. त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा असतो आणि त्यासाठी त्या कंपनीने नमूद केलेली रक्कम आपल्याला ऑनलाइन स्वरूपात भरायची असते..
- वय मर्यादा – वय मर्यादा 18 ते 38 पर्यंत असते प्रत्येक प्रवर्गानुसार ही मर्यादा कमी जास्त होऊ शकते त्यासाठी मुख्य जाहिरात तपासावी.
- पगार – जिल्हा परिषदे मार्फत ग्रामसेवकाला वेतन दिले जाते. सातव्या वेतन आयोगानुसार 18 ते 23 हजार रुपये वेतन मिळतं .
कागदपत्रे –
- दहावी – बारावी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट. ( पदवी असेल तर अर्जामध्ये नमूद करा. )
- सहा महिन्याच्या आतील फोटो . फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची असते .
- त्याची साईज ५० KB पर्यंत असने आवश्यक आहे .
- जात प्रमाणपत्र.
- MS- CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र.
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र ( ews )
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाचे प्रमाणपत्र.
विषय ज्ञान –
विषय = मराठी १५ प्रश्न इंग्रजी १५ प्रश्न गणित व बुद्धिमत्ता १५ प्रश्न सामान्य ज्ञान १५ प्रश्न तांत्रिक प्रश्न ४० प्रशन
वेळ ९० मिनिट्स . प्रश्न – १०० गुण – २००
- मित्रांनो लक्षात घ्या गुणांची पद्धत वर दिली त्या प्रमाणे आहे तरी सुद्धा काही वेळा अस अनुभवास येत की तांत्रिक प्रश्न हे सामान्य ज्ञान घटकात विचारल्या जातात, त्यावेळी प्रश्नांची संख्या कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे अभ्यासाची पद्धत चौकस असावी. कोणत्याही विषयाचे कितीही प्रश्न आले तरी सोडवण्याची तयारी असु द्या.
- तुम्हाला भीती दाखवणे किंवा संभ्रमात टाकणे हा माझा मुळीच उदेश नाही तुम्ही सावध राहावे या दृष्टीने सांगत आहे. मागच्या परीक्षा दिलेल्या त्या विद्यार्थ्याना याचा अनुभव आहे. गट क प्रवर्गातील सरळ सेवा परीक्षा असल्या कारणाने जास्त खोलवर अभ्यास करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे प्राथमिक अभ्यासाला महत्व द्या. मागील प्रश्न पत्रिका तपासा( साईट वर उपलब्ध आहेत ) म्हणजे पेपर कसा असतो याचा अंदाज येईल.
DISCLAIMAR
- लक्षात घ्या ही माहिती केवळ भरती संदर्भातील माहिती मिळावी आणि ग्रामसेवक पदाची ओळख निर्माण व्हावी या उदेशाने लिहिली गेली आहे, त्यामुळे ही माहिती अधिकृत समजू नये, ग्रामसेवक भरतीची जाहिरात येते तेव्हा संपूर्ण जाहिरात आणि त्या सोबत सूचना पत्र देखील असत तेच अधिकृत असत. त्यामध्ये वेळोवेळी बदल झालेल्या सूचनांचा समावेश असतो. त्यामुळे तीच माहिती अधिकृत समजावी .
मागचे ग्रामसेवक भरती चे सर्व पेपर आपल्या साईट वर उपलब्ध आहेत त्याचा नक्की फायदा घ्या.