महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी / सी .. 🥇( पूर्व परीक्षा )
2024 - 2025

2023 पूर्वी महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी व सी  वेगवेगळ्या परीक्षा होत्या, परंतु 2023 पासून ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र होत आहेत तर त्यामध्ये नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्याची पीडीएफ खाली दिली आहे 2023 पूर्वीचा अभ्यासक्रम आणि नवीन आलेला अभ्यासक्रम यामध्ये जास्त तफावत नाही पाहू पुढीलप्रमाणे .. 

आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत आणि त्यातील महत्त्वाचे घटक ज्यावरती प्रश्न विचारतात त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत ..

🎯 बाजूच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम दिसत असेल. त्यातील मुख्य विषय लक्षात घ्या. समजून घ्या. 

🎯 प्रत्येक विषयाची सूची आणि त्यातील महत्वाचे घटक खाली नमूद केले आहेत ते तुम्ही अभ्यासा. म्हंजे तुमच्या हे लक्षात येईल की कोणत्या विषयातील महत्वाचा घटक कोणता आहे आणि त्यातील नेमक आपल्याला काय वाचायच आहे. 

🎯 pdf खाली पुढील पानावर जाण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे त्याचा वापर करा. 

🎯 सर्वात खाली काही महत्वाच्या लिंक दिलेल्या आहेत त्या तुम्हाला उपयोगी ठरतील. 

⏭️ विषयानुसार महत्वाचे घटक खालील प्रमाणे . 🧶

⛔ चालू घडामोडी – योजना ( महत्त्वपूर्ण घटक स्पष्टीकरणात्मक अभ्यास आवश्यक ) पुस्तक – ( लेखक संबंधित पुरस्कार ) खेळ – ( संबंधित खेळाडू पुरस्कार विक्रम ) संशोधन पुरस्कार संबंधितज्ञान.

आयोग – ( याचा  स्पष्टीकरणात्मक अभ्यास महत्वाचा  ) प्रथम गोष्टी व्यक्ती विषय संबंधित अभ्यास व्यक्ती विशेष वन लाइनर स्टडी

राज्यघटना _ कलम – प्राथमिक अभ्यासाला महत्त्व,तीन सूची –  केंद्र सूची राज्य सूची संवर्ति सूची आयोग समिती –  स्थापना अध्यक्ष कार्य अहवाल राज्यपाल मुख्यमंत्री –  मूलभूत कर्तव्य संदर्भित प्राथमिक महत्त्वपूर्ण, राज्यघटना अभ्यासताना प्राथमिक गोष्टींना महत्त्व देणे

 अर्थशास्त्र  – लोकसंख्या, योजना, बँक, या घटकांवरील प्राथमिक अभ्यास तसेच मागील प्रश्नांचा सराव व त्या संबंधित घटकांचा प्राथमिक घटक अभ्यास,  अर्थसंकल्प – नियोजन – अंदाजपत्रक – सरकारी जुन्या योजना, मौद्रिक धोरण, बेरोजगारी, उत्पन्न, उत्पादन, राजकोषीय सुधारणार याचा प्राथमिक अभ्यास महत्त्वाचा.

विज्ञान – या घटकांमध्ये सुद्धा प्राथमिक अभ्यासाला महत्त्व आहे.  जसे आरसे रोग कारके औषधे 

शोध त्यातील कारणे, परिणाम, वनस्पती संबंधित रोग कारणे आवश्यक.  विज्ञान या घटकावर लॉजिकली प्रश्न असतात जिल्हा परिषद शाळेतील विज्ञान पुस्तक वाचने..

इतिहास – या घटकातील प्रश्न वन लाइनर मध्ये येतात ( मुद्दा लक्षात घ्या )  त्यात समाजसुधारकांसंबंधीत त्यांच्या संस्था पुरस्कार पुस्तके कार्य संबंधित प्रश्न फिरतो त्यामुळे  समाजसुधारक हा घटक अभ्यासणे आवश्यक.  1857 चा इतिहास त्यामध्ये कमिशनर गव्हर्नर यांनी केलेली काम त्यांनी केलेल्या सुधारणा त्या संबंधित योजना आयोग उठाव – राष्ट्रीय काँग्रेस. गांधी युग. 

भूगोल – भारताचा तसेच महाराष्ट्राचा.  भारताचा अभ्यासताना जुन्या प्रश्नपत्रिका पहिल्या तर लक्षात येईल उद्योगधंदे खणीजसाठा उद्याने डोंगररांगा अश्या पद्धतीने वनलाईनर आणि जोड्या लावा मध्ये प्रश्न आलेले आहेत.  महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासतानां प्राथमिक अभ्यास सर्वात महत्त्वपूर्ण, त्यामध्यील घटक, नदी प्रणाली – जिल्हा विशेष, यामध्ये खनिजसाटा डोंगररांग लोकक्षेत्र विभाग पाऊस लोकसंख्या नदीपरणाली प्रश्न असतात.

बुद्धिमत्ता अंकगणित – या घटकावर प्रश्न घन संभाव्यता, सिरीयल, सरासरी, प्रश्नचिन्ह, संख्या, सहसंबंध, आकृती मोजणे, काम – काळ – वेग अंतर ,संभाव्यता, शेकडेवारी  आणि लॉजिकली प्रश्न असतात

🔶 परीक्षार्थी मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्व परीक्षेमध्ये प्राथमिक अभ्यासाला अनन्य साधारण महत्त्व आहे.. प्राथमिक अभ्यास खूप गरजेचे आहे पूर्व परीक्षेसाठी.. जास्तीत जास्त मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा थोडक्यात अभ्यासा, तुमच्या लक्षात येईल की कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले आहेत ? प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे.  आणि हे जे मी लिहिलेलं आहे ते मी माझ्या मागच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यासावरून आणि माझ्या अनुभवावरून लिहिलेला आहे. तुम्ही सुद्धा मागच्या प्रश्नपत्रिका तपासा ते मुद्दे लक्षात घ्या, घटक लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त सराव करा..

🔶 राष्ट्रीय  पुरस्कार वन लाइनर स्वरूपात येतात.  राष्ट्रीय पुरस्कार शक्यतो ऑनलाईन किंवा जोड्या लावा यामध्ये येतात.  

महत्त्वाचे आयोग त्यामध्ये, मागासवर्गीय आयोग – अल्पसंख्याक आयोग  – महिला आयोग – अनुसूचित जाती जमाती आयोग. संबंधित स्पष्टीकरणात्मक अभ्यास करा म्हणजे त्याचे कलम त्याची समिती महत्त्वपूर्ण कार्य .. महिला आणि बाल विकास संबंधित योजना पोर्टल याचा प्राथमिक अभ्यास . 

🔶 जोड्या लावा या घटकावरील प्रश्न शक्यतो आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी मध्ये पुरस्कार असतील, आयोग स्थापना वर्ष , व्यक्ती समाजसुधारकांमध्ये समाज सुधारक आणि संस्था,किवा पुरस्कार. प्राणी – ब्रिड,  जिल्हा विशेष मध्ये जलविद्युत केंद्र – पुळण आणि जिल्हे – तालुके . नदी – उपनदी . अश्या घटकावर असतात.  

  •  महत्वाची काही State Board पुस्तके उपलब्ध आहेत . ते पुढील प्रमाणे –               
  • Telegram  ग्रुप ला  जॉइन व्हा –                                                                              
  •  Youtube chanel  ला भेट द्या  –                                                                            

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती संपूर्ण मार्गदर्शन      

🎯 पोलिस भरती संपूर्ण मार्गदर्श      

🎯 आरोग्य भरती संपूर्ण मार्गदर्श     

🎯 ग्रामसेवक भरती संपूर्ण मार्गदर्श 

🎯 राज्यसेवा  संपूर्ण मार्गदर्शन          

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती सराव पेपर       

🎯 पोलिस भरती सराव पेपर       

🎯 आरोग्य भरती सराव पेपर      

🎯 ग्रामसेवक भरती सराव पेपर   

🎯 राज्यसेवा सराव पेपर            

Scroll to Top