पोलिस भरती

पोलिस भरती संपूर्ण मार्गदर्शन २०२४🥇

 

परिक्षार्थी  मित्रांनो पोलिस भरती संबंधित महत्वाची महिती आणि नेहमीचे पडणारे प्रश्न आपन पाहणार आहोत.  कोणतीही परीक्षा देताना आपल्याला खालील मुद्यांकडे लक्ष देन गरजेच असत. ते महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे असतील. 

पदाचे नाव – पोलीस भरती ( शिपाई, चालक, bandman, जेल पोलिस, राखीव पोलिस दल, असे पद असतात याचा लेखी पेटर्न- सामान्य ज्ञान, गणित,मराठी,बुद्धिमत्ता, २५ प्रत्येकी असते.  ( जर पदानुसार ऐखादा विषय वाढला तर तो विषय २० मार्क व बाकी देखील २०-२० गुणाचे विषय ठरतात उदा – चालत पदासाठी वाहन नियम २० प्रश्न २० मार्क, असतात अश्या प्रकारे )

पद संख्या – १००००  जागा ( जाहिरात मध्ये असतील तेवढे पद ) 

 

शैक्षणिक पात्रता – 12th Pass ( मूळ जाहिरात नेहमी वाचावी काही पद १० पास वर असतात )

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र ( ९ महिन्यांचा प्रशिक्षण दिवसा नंतर पोलिस मुख्यालय – पोलिस चौकी – पोलिस आयुक्तालय – पोलिस स्टेशन . अश्या ठिकाणी रुजू )

वयोमर्यादा – खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: रु. 450 /- मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती – ऑनलाइन

परीक्षा पद्धत – ऑनलाइन ( काही परीक्षा लेखी होतात )

 

 

अर्जा संबंधीत सर्वसाधारण सूचना /

  1. ( पोलिस भरती अधिकृत पोर्टल त्या वेळी उपलब्ध असत ) या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी ( link ) दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.
  2. उमेदवार एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरू शकतो का ?तर उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे ( सूचना पत्रक व्यवस्तीत वाचने )
  3. परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल ? ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन भरणा – पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरणा करू शकता.
  4. अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. तर तुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.
  5. आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. अर्ज शुल्क परत मिळेल काय ? तर याच उत्तर नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही. ( सूचना पत्रक व्यवस्तीत वाचने )
  6. ज्या पदासाठी अर्ज केला आहे , त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी तुम्ही mahapolicerecruitment.support@mahait.org येथे ई-मेल द्वारे अथवा 022-61316418 या  ठिकाणी संपर्क साधावा.
  7. पासवर्ड विसरला असाल तर मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा सादर करा व त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल त्यावर क्लिक करा. अन्यथा 022-61316418 ह्या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधा
  8. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येते  पहिला अर्ज रद्द करा, मात्र शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होतो, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज रद्द करू शकता आणि पुन्हा ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकता.

 

शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई नियमामध्ये २०२२ नुसार सुधारणा केली आहे त्यानुसार आता _

पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. आणि त्या नंतरच मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये_

पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर

महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण

असणार आहेत.

 
 
  1. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. 
  2. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
  3. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, 
  4. लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. 
  5. परीक्षा मराठी भाषेत असेल आणि  लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी ( mcq  ) प्रकारचे असतील लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. 
  6. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. लेखी परिक्षा OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने असणार आहे  .

  1. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. 
  2. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
  3. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, 
  4. लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. 
  5. परीक्षा मराठी भाषेत असेल आणि  लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी ( mcq  ) प्रकारचे असतील लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. 
  6. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. लेखी परिक्षा OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने असणार आहे  .

Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Details ५० मार्क असेल

धावणे      मार्कधावणे      मार्कगोळा फेक      मार्क

पुरुष / मूल १६०० मिटर २० मार्क १०० मिटर १५ मार्क ८.५०  मीटर १५ मार्क 

स्त्री / मुली ८००  मिटर २० मार्क १०० मिटर १५ मार्क ६        मीटर १५  मार्क 

 

 ( लक्षात घ्या ज्या परीक्षेसाठी १०० गुणांची शारीरिक चाचणी असते मग त्या मध्ये, धावणे – लांब उडी – पूल अप्स – गोळा फेक असतात आणि ज्या परीक्षेमद्धे ५० गुणांची शारीरिक चाचणी असते तिथे लांब उडी आणि पूल अप्स वगळतात, तरी सुद्धा मूळ जाहिरात वाचावी जेणेकरून संबंधित भरतीचे ज्ञान होईल  ) 

 

 

गोळा वजन ७.२६० केजी गोल ( गोळा फेक अंतर परीक्षे नुसार कमी जास्त होत )

लांब उडी मूल – ५ मीटर २० गुण ; मुली ३.८० मिटर २५ गुण 

पुलपस १० पुळपास २० गुण – पूल अप्स मुलीनं नसतात (मूळ जाहिरात पहावी काही परीक्षाना आहेत )

सशत्र पोलिस दलातील उमेदवारांसाठी ५ किमी धावणे ५० गुण, १०० मीटर २५ गुण गोळा फेक २५ गुण. संपूर्ण १०० गुण.  

उमेदवाराची उंची किती असावी? 

महिला (Female)  महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.

पुरुष (Male)         पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.

 

छाती 

पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. ( काही परीक्षाना ५ cm छाती फुगवावी लागते ) 

महिला लागू नाही

 

विषय (Subject)     गुण (Marks)

अंकगणित                                   2५  गुण

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी        2५  गुण

बुद्धीमत्ता चाचणी                           2५  गुण

मराठी व्याकरण                             2५  गुण                 (  इंग्रजी व्याकरण नाही )  

फक्त मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम  20 गुण ( त्यावेळी बाकी विषय २० मार्क )

एकूण गुण – 100

 

 

वय / मर्यादा  

खुला 18 ते 28                     मागास – 18 ते 33       खेळाडू- 18 ते 38             भूकंपग्रस्थ उमेदवार- 18 ते 45

प्रकल्पग्रस्थ उमेदवार  18 ते 45     अनाथ उमेदवार – 18 ते 33       पोलीस पाल्य- 18 ते 33     गृहरक्षक- 18 ते 33

माजी सैनिक- उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.

महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

 
 

 महत्त्वाचे कागदपत्रे

  • फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची असते. त्याची साईज ५० KB पर्यंत असने आवश्यक आहे. 
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS- CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र. 
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदारओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र. 
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता ( असल्यास ) 
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र.
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र.
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

• पोलिस भरती पगार 

पगार सातव्या वेतन आयोगानुसार – २४५०० ( पहिला पगार जवळपास – )

• पोलिस भरती मधील बढती. 

जॉयनिंग केल्या नंतर १० -१० वर्षीयणी बढती होते. शेवट psi . 

phc सिपाई – हवालदार – apsi  – psi .. 

 

लक्षात घ्या ही माहिती केवळ भरती संदर्भातील माहिती मिळावी आणि  पोलिस भरती संबंधित भरतीची ओळख निर्माण व्हावी या उदेशाने लिहिली गेली आहे, त्यामुळे ही माहिती अधिकृत समजू नये, पोलिस भरतीची जाहिरात येते तेव्हा संपूर्ण जाहिरात आणि त्या सोबत सूचना पत्र देखील असत तेच अधिकृत असत त्यामध्ये वेळोवेळी बदल झालेल्या सूचनांचा समावेश असतो. 

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती संपूर्ण मार्गदर्शन      

🎯 पोलिस भरती संपूर्ण मार्गदर्श      

🎯 आरोग्य भरती संपूर्ण मार्गदर्श     

🎯 ग्रामसेवक भरती संपूर्ण मार्गदर्श 

🎯 राज्यसेवा  संपूर्ण मार्गदर्शन          

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती सराव पेपर       

🎯 पोलिस भरती सराव पेपर       

🎯 आरोग्य भरती सराव पेपर      

🎯 ग्रामसेवक भरती सराव पेपर   

🎯 राज्यसेवा सराव पेपर            

Scroll to Top