महिला आणि बाल विकास भरती संपूर्ण मार्गदर्शन

महिला आणि बाल विकास संदर्भातील ही भरती राज्यसेवा अंतर्गत सरल सेवा मार्फत होते.

यामधील पद, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक, सांख्यिकी अधिकारी- गट ब, महिला व बाल विकास विभाग. 

परीक्षा  ( २०० गुण ) – मुलाखत ( ५० गुण ) – जॉयनिंग. अश्या पद्धतीने ह्या जागा भरल्या जातात. 

                  महिला आणि बाल विकास विभागातील हे पद वर्ग ऐक आणि दोन मधील आहेत  .

जाहिरात पाहताना बघायच्या मुख्य गोष्टी पुढील प्रमाणे .. 

  • पद संख्या – 0000/  जागा ( जाहिरातीत नमूद असतील त्या प्रमाणे पद संख्या  ) 
  • शैक्षणिक पात्रता – पदवी 
  • वयोमर्यादा – खुला वर्ग:- १८ ते ३८ वर्षे  ( मागासवर्गाला प्रवर्गानुसार सुट )
  • अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: रु. ३५० /- मागास प्रवर्ग: रु.२९५ / ( जाहिराती नुसार )
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • परीक्षा पद्धत – लेखी / वास्तुनिष्ट बहुपर्यायी  ( Multiple choice Qustion  )
  • गुण प्रदान ¬¬¬_ १०० प्रश्न २०० गुण = ५० गुणांची मुलाखत 
  • वेतन श्रेणी _ पदानुसार , २०००० ते ३४८०० 

अर्जा संबंधीत सर्वसाधारण सूचना 

या जागा महिला आणि बाल विकास अंतर्गत लोकसेवा आयोग सरल सेवे द्वारे भरते. लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिराती खाली apply पर्यायावर क्लिक करून फॉर्म भरावा ,

त्या आधी तुमची सर्व प्रोफाइल व्यवस्तीत भरून घ्या. त्या नंतर apply करा.  

वेळोवेळी बदलेलेल्या सुचनांच पालन करा. ज्या वेळी फॉर्म भरणार असाल तेव्हा मुख्य जाहिरात नक्की वाचा .

 

पद  भरती संदर्भात महत्वाचे पुस्तक व अभ्यासघटक, विषय ज्ञान –

  • विषय – सामान्य अध्ययन, बुद्धिमापन विषयक प्रश्न, विभागाशी/ विषयांशी संबंधित घटक.
  • माध्यम – मराठी 
  • गुण २०० ,  प्रश्नसंख्या १००,   कालावधी  १ तास   
  • दर्जा – पदवी
  •  प्रश्न पत्रिका स्वरूप –  वस्तुनिष्ट बहुपर्यायी 

महत्वाचे अभ्यासघटक / पुस्तके 

🔺 सामान्य अध्ययन जागतिक, भारतातील, चालू घडामोडी (  राजकीय, औद्योग, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, भौतिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक प्रकरणांशी संबंधित चालू घडामोडी )

🔺 बुद्धिमापन चाचणी/ अंकगणित (  शालांत दर्जा ) उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न   विचारण्यात येतात ( मागच्या प्रश्नांचा सराव करा ) 

🔺 व्याकरण – शालांत दर्जा-  वाचन, आकलन –  एक मराठी व इंग्रजी उत्तरा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे मराठी व इंग्रजी व्याकरण ( बाळासाहेब शिंदे – मराठी व्याकरण )

 🔺 भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्र ( जिल्हा परिषद विज्ञान पुस्तके  )

🔺 समाजशास्त्र व मानसशास्त्र – समाजाचे  स्वरूप, मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक परिवर्तन, समाजाचे विभाग, सामाजिक जडणघडण, समाज संस्थेचे बदलते स्वरूप, भारतातील विशेषत महाराष्ट्रातील सामाजिक समस्या, सामाजिक संशोधन पद्धती, समाजव्यवस्था, संस्कृती, सामाजिककरण. ( अकरावी बारावी खाली दिलेल्या प्रमाणे  )

 

🔺 मानसशास्त्र- व्याख्या व स्वरूप मानसशास्त्राची व्याप्ती संशोधन पद्धत अवधान अध्ययन मानवी स्मृती प्रेरणा भावना मानवी वर्तनाचे आधार मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे 

🔺 माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान संक्षिप्त रूपे इंटरनेट व ईमेलचे मूलभूत आधार त्याचा अर्थ त्याचे फायदे तोटे जागतिकीकरण व जनसंप्रेषण माध्यमे त्यांचा प्रभाव . 

🔺 समाजकार्य-  व्यावसायिक समाजकार्य समाजकार्याच्या संशोधन पद्धती समाजकार्याचा इतिहास समाजकार्याची तत्त्वज्ञान समाजकार्याची तत्वे व पद्धती व भारतातील विशेषत महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांचे कार्य . 

 🔺 भारतीय संविधान-  राज्यघटना,  शासनाची रचना,  जिल्हा परिषद,  पंचायत समिती व ग्रामपंचायत रचना व कार्य

 🔺मानवी हक्क –  मानवी हक्काचा जाहीरनामा, मानवी हक्क अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा, महिला व बालविकासाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रम, महिला धोरण, बाल विकास, बालकांची राष्ट्रीय सणात, महिला व बालके यांचे हक्क, सहस्त्र विकास उद्दिष्टे कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र अहवाल, बाल मृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर . 

 🔺 महिला व बालविकास –  केंद्रस्तरीय व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना, महिला व बालकांच्या संदर्भातील काही ऐतिहासिक निर्णय,  सर्व प्रमुख आयोग आणि त्यांच्या रचना व कार्य . 

 🔺 महिला व बालक कायदे –  महिना व बालकांच्या संदर्भातील कायदे, अधिनियम, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अधिनियम, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, वैद्यकीय गर्भपात अधिनियम, अनैतिक व्यापार अधिनियम,  कौटुंबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण अधिनियम २००५,  लिंग निदान प्रतिबंधक अधिनियम, गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 . 

 🔺 गृह विज्ञान –  पोषक आहार विज्ञान, पोषक आहाराचे मूल घटक, पोषक हा विषय रसायनशास्त्र, अन्नविषयक सूक्ष्मशास्त्र, सार्वजनिक पोषण आहार, शास्त्र भूत आहार, अन्नाचे कॅलरी मूल्य मोजणे चांगले आरोग्य व जीवनमानासाठी मानवी शरीरास आवश्यक मूल्य व ऊर्जा,  भारतातील पोषण विषयक समस्या त्याची कारणे त्यामुळे होणारे परिणाम, शासकीय धोरणे, योजना, पूरक पोषण विषयक कार्यक्रम, दुपारचे भोजन योजना . 

🔺 बाल विकास व महिला विकास-  बाल विकासाची ओळख अर्थ व्याप्ती,  विकासाच्या अवस्था, अंगेवाड विकास वस्ती पूर्व विकास, अभ्यास घटकांच्या अंतर्गत नवजात अवस्था, बाल्यावस्थेतील शारीरिक विकास, नैतिक विकास, भाषा विकास, सामाजिक विकास, बाल संगोपन व शिक्षण, लसीकरण, बालकांचे विविध आजार, बाल विकासाची आव्हाने, बालकांच्या विविध समस्या व उपाययोजना, महिलांच्या समस्या व प्रश्न,  आरोग्य विषयक इतर बाबी . 

 🔺 महिला आणि बालविकास संदर्भातील सर्व माहिती महत्वाची आकडेवारी  ही महिला आणि बालविकास विभागाच्या वेबसाईटवरून घेणे कारण तिथे सर्व अपडेटेड माहिती मिळते आणि ती माहिती अधिकृत  असते

 

पुस्तके 

  • बालविकास ११ आणि १२ वी 
  • अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान ११ आणि  १२ वी  
  • मानसशास्त्र ११ आणि  १२ 
  • समाजशास्त्र ११ आणि  १२ 
  • ५ वी ते १० जिल्हा परिषद पुस्तक विज्ञान . 
  • महिला आणि बालविकास संबंधित योजना / पोर्टल महत्वपूर्ण . 
  • महिला आयोग, महिला हक्क, बालकांचे हक्क त्यासंबंधित नियम /कायदे/ कलम सर्व पाठ करणे

बाल भारती app वर किंवा गुगल वर सर्व पुस्तके मिळतील . 

काही महत्वाच्या नोट्स टेलिग्राम चेनल वर उपलब्ध आहेत त्या अभ्यासा . 

 

⛔ लक्षात घ्या ही माहिती केवळ महिला आणि बाल विकास पदं भरती संबंधित माहिती मिळावी या उदेशाने लिहिली गेली आहे, त्यामुळे ही माहिती अधिकृत समजू नये, पद भरतीची जाहिरात येते तेव्हा संपूर्ण जाहिरात आणि त्या सोबत सूचना पत्र देखील असत तेच अधिकृत असत. त्यामध्ये वेळोवेळी बदल झालेल्या सूचनांचा समावेश असतो त्यामुळे तीच माहिती अधिकृत समजावी . 

 

📌 महत्वाची काही State Board पुस्तके उपलब्ध आहेत . ते पुढील प्रमाणे –                       

📌Telegram  ग्रुप ला  जॉइन व्हा –                                                                              

📌 Youtube chanel  ला भेट द्या  –                                                                            

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती संपूर्ण मार्गदर्शन      

🎯 पोलिस भरती संपूर्ण मार्गदर्श      

🎯 आरोग्य भरती संपूर्ण मार्गदर्श     

🎯 ग्रामसेवक भरती संपूर्ण मार्गदर्श 

🎯 राज्यसेवा  संपूर्ण मार्गदर्शन          

काही महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहेत, त्या सुद्धा पहा . 🕹️

🎯 तलाठी भरती सराव पेपर       

🎯 पोलिस भरती सराव पेपर       

🎯 आरोग्य भरती सराव पेपर      

🎯 ग्रामसेवक भरती सराव पेपर   

🎯 राज्यसेवा सराव पेपर            

Scroll to Top