वनरक्षक भरती संपूर्ण मार्गदर्शन 🦚
परिक्षार्थी मित्रांनो वनरक्षक भरती संबंधित महत्वाची महिती आणि नेहमीचे पडणारे प्रश्न आपन पाहणार आहोत.
वनरक्षक भरती संबंधित भरती चे पत्रक जाहिर झालेल आहे. वनरक्षक आणि लेखापाल या दोन पदांसाठी जाहिरात आहे. दोन्ही पद गट क आणि गट ड संवर्गातील आहेत. त्याची परीक्षा पद्धत आणि भरती प्रक्रिया वेगवेगळी आहे ती समजून घ्या.
( प्रथम वनरक्षक पद पाहू ) वन विभागातील हे पद वर्ग तीन मधील वनरक्षक बल मधील आहे .
जाहिरात पाहताना बघायच्या मुख्य गोष्टी पुढील प्रमाणे ..
- पद संख्या – 0000a/ जागा ( सदया फक्त परिपत्रक आलेल आहे जाहिरात लवकरच येईल / पद संख्या )
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass ( विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र, या पैकी ऐक विषय घेऊन पास )
- _ 10th pass मागासवर्ग असेल तर.
- वयोमर्यादा – खुला वर्ग:- १८ ते २५ वर्षे ( मागासवर्गाला प्रवर्गानुसार सुट )
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: रु. 500 /- मागास प्रवर्ग: रु.350 /
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- परीक्षा पद्धत – ऑनलाइन ( परिपत्रकात सांगितल्या प्रमाणे )
अर्जा संबंधीत सर्वसाधारण सूचना –
- वन विभार भरती चे अधिकृत पोर्टल त्या वेळी उपलब्ध असते त्या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी ( link ) दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.
- उमेदवार एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरू शकतो परंतु परिपत्रकात सांगितले आहे फक्त पहिला अर्ज ग्राह्य धरला जाईल बाकीचे बाद होतील त्यामुळे ऐकच अर्ज करावा.
- ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी तुम्ही त्याच पोर्टल वर सर्वात खाली त्या संबंधित काही मेलआयडी आणि नंबर असतात त्या ठिकाणी संपर्क साधावा.
- पासवर्ड विसरला असाल तर मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा सादर करा व त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल त्यावर क्लिक करा.
- चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास त्यात बदल करता येतो परंतु असे होऊ नये म्हणून काळजी घ्या कारण कंपनीने त्या वेळी घेतलेल्या निर्णयावर ते अवलंबून असत .
भरती संदर्भात महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे –
- शैक्षणिक पात्रता. वनरक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- ( विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र, या पैकी ऐक विषय घेऊन पास ) मागासवर्ग असेल तर 10 पास
- पद्धत – वनविभाग यांची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची असते. त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा असतो आणि त्यासाठी त्या कंपनीने नमूद केलेली रक्कम आपल्याला ऑनलाइन स्वरूपात भरायची असते ..
- वय मर्यादा – वय मर्यादा 18 ते २५ पर्यंत असते ( प्रत्येक प्रवर्गानुसार ही मर्यादा कमी जास्त होऊ शकते त्यासाठी मुख्य जाहिरात तपासावी. )
- पगार – वनविभाग अंतर्गत होणाऱ्या या पद भरतीसाठी गट-क आणि गट- ड मधील उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 18 ते २० हजार रुपये वेतन मिळतं
कागदपत्रे –
- दहावी – बारावी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट.
- सहा महिन्याच्या आतील फोटो . फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची असते .
- त्याची साईज ५० KB पर्यंत असने आवश्यक आहे .
- जात प्रमाणपत्र.
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र.
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र ( ews )
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाचे प्रमाणपत्र.
विषय ज्ञान
- विषय ज्ञान –
- विषय – मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान + शारीरिक चाचणी = वेळ
- प्रश्न/गुण – १५ /३० १५ /३० १५ /३० १५ /३० ८० गुणांची (धावणे ) ९० मिनिट
थोडक्यात महत्वाचे 📌
- एक प्रश्न दोन गुण .
- १ प्रश्न २ गुण अश्या पद्धतीने परीक्षा असेल १२० गुणांची लेखी व ८० गुणांची शारीरिक चाचणी होईल. लेखी मध्ये ४५ % गुण घेणे अनिवार्य आहे त्यानंतर शारीरिक चाचणी होईल. लेखी मध्ये ०.५० रूणात्मक गुण संख्या असेल. १० प्रश्न चुकले तर ५ गुण वजा करण्यात येतील. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा असेल त्यासाठी बहुपर्यायी परीक्षा पद्धत असेल ( mcq ) सामान्य ज्ञान मध्ये पर्यावरण / जैवविविधता / महाराष्ट्र इतिहास भूगोल. घटकाला महत्व आहे. ८० गुणांची शारीरिक चाचणी ही धावणे या प्रकारात असेल त्यातील गुणदान पद्धत पुढील प्रमाणे असेल.
- पुरुष उमेदवार _ ( ३० मिनिटात ५ किमी चालणे / धावणे )
- महिला उमेदवार _ ( २५ मिनिटांत ३ किमी चालणे / धावणे
- अश्या प्रकारे परीक्षा असेल .. ( मुख्य जाहिरात तपासावी )
⛔ Disclaimar ⛔
- लक्षात घ्या ही माहिती केवळ वनभरती संदर्भातील माहिती मिळावी आणि वनविभाग भरती संबंधित परीक्षांची ओळख निर्माण व्हावी या उदेशाने लिहिली गेली आहे, त्यामुळे ही माहिती अधिकृत समजू नये, वन विभाग भरतीची जाहिरात येते तेव्हा संपूर्ण जाहिरात आणि त्या सोबत सूचना पत्र देखील असत तेच अधिकृत असत. त्यामध्ये वेळोवेळी बदल झालेल्या सूचनांचा समावेश असतो त्यामुळे तीच माहिती अधिकृत समजावी
वन विभाग लेखापाल पद परीक्षा २०२३
- वनविभाग पद – लेखापाल
- शैक्षणीक पात्रता – पदवी
- अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन ( परीक्षा ऑनलाइन – mcq )
- कागदपत्र – वरती सांगितल्या प्रमाणे
- वेतन श्रेणी – २९००० – ९७०००
- वय मर्यादा – १८ ते ३८ ( वय सवलत प्रवरगानुसार )
- परीक्षा शुल्क – १००० रुपये / ९०० रुपये मागासप्रवर्ग.
- विषय ज्ञान –
- विषय मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान वेळ
- प्रश्न / गुण २५/५० २५/५० २५ / ५० २५ / ५० १२० मिनिट