“मशाल” 🥊

परवा शाळेत गेल्यावर पाचवीच्या वर्गातली एक मुलगी जवळ येवून म्हणाली,’’ सर, मला पण बाबा नाहीत मी पण तुमच्यासारखं साहेब होणार’’ माझ्या डोळ्यांत झटकन पाणी आलं, मी निशब्द झालो… परत येताना दिनू म्हटला, यासाठीच आम्हाला मिरवणूक काढायची होती. गावातल्या ४ अनाथांना जरी बळ मिळालं तरी आमच्या खटाटोपाचं सार्थक हेईल… तसं साहेब तर मागच्या वर्षीच झालो होतो,पण ज्या गावाने वडिलांची प्रेतयात्रा पाहीली त्याच गावात परवा माझी मिरवणूक निघाली…आई सोबत जीप मध्ये उभा होतो त्यावेळी १३ वर्षापूर्वीचा तो दिवस डोळ्यासमोर उभा राहीला, त्यावेळी पण गर्दी होती आणि आज पण गर्दीच आहे पण ती गर्दी अश्रू पुसण्यासाठी आली होती तर आजची गर्दी त्या माऊलीचे आनंदाश्रू पाहण्यासाठी जमली होती.                                                               

आजही तिचं ओसाड कपाळ पाहीलं की एक वेगळंच बळ अंगात संचारतं. वडिल गेले तेव्हा ती अगदीच कोसळली होती, तिची दातखिळ बसली होती, तिचे विस्कटलेल्ले केस, अर्ध प्सलेलं कुंकु आणि तिला सावरणारी माझी मेठी बहीण, ते चित्र आठवलं की आजही काळजीत चिर्रर होतं. एका विधवेचं आयुष्य मी अनुभवलंय,

अंगठ्याला धारधार दगडाची ठेच लागून भळभळ रक्त आल्यावर ज्या वेदना होतात तशाच वेदना मला व्हायच्या, जेव्हा कोणत्याही ठिकाणी आईच्या नावापुढे सौभ्याग्यती च्या ऐवजी श्रीमती लिहावं लागायचं….संक्रांतीला सगळा गाव विठ्ठल रूक्मिणीच्या मंदीरात जमायचा आणि ती माऊली ऊसाला पाणी द्यायची.प्रत्येक सत्कारात माझ्या कपाळी लावलेला कुंकव हा माझ्या आयुष्याची शत्रू बनला होता. घरी आलेल्या पाहुणीला कुंकु लावायला पण शेजारून कोणाला तरी ती बालवून आणीयची. 

कित्येकदा लक्ष्मीचं पुजन न करता तिनं त्या ट्रंकात परत ठेवल्यात….माझ्या वडीलांच्या चितेचा विस्तव जरी विझलेला असला तरी ती धग आणि आग आजही माझ्या काळजात आहे. या आगीतून महाराष्ट्रात लाखो मशाली पेटो हीच अपेक्षा ….

  • केदार बारबोले – राज्यात ६ वा (MPSC 2021)
  • पोस्ट साभार – MPSC-UMED ( टेलिग्राम  )
Scroll to Top