येणाऱ्या ग्रुप – बी साठी कानमंत्र .

Combine: 30 April 2023 

1) चालू घडामोडी अगोदर काही वाचलेले असेल तरच तेच Revise करा. आत्ता नव्याने एकही शब्द पाहता कामा नये. या ऐवजी core GS मधील काहीही पाहणे हितावह आहे. Current काहीच न पाहणे हे ही कमी आत्मविश्वास राहण्यास कारणीभूत असते. या अर्थाने सुवर्णमध्य साधा.

2) इतिहास अलीकडे आवाक्यात आलेला आहे. विद्यार्थी गुण घेत आहेत. Combine साठी आवश्यक घटक PYQ वरून निवडून त्या त्या topics चे सर्व PYQ मल्टिपल उजळणी ने जवळपास पाठ होतात. असे काही नव्याने होणार नाही. याला वेळ लागतो. पण त्या दिशेत तुमचा या विषयाबद्दल दृष्टीकोन आणि तयारी असली पाहिजे.

3) भूगोल विषयात out of घेणारे अनेक जण आहेत. Maharashtra आणि India selected पक्केच हवे. येथे पिछाडी वरती असाल तर मात्र 50 प्लस स्कोअर होणार नाही. बाकी काहीही असो. All PYQ जिभेवर हीच स्थिती हवी. याला पर्याय नाही.

4 ) अर्थव्यवस्था बाबत आयोग अलीकडे पठडी बाजपणा पासून बाजूला जाताना दिसत आहे. Topics मद्ये वैविध्य नाही मात्र त्याच टॉपिक वरील प्रश्नांत वैविध्य दिसते. आयोगाची भाषा अंगवळणी पाडा. कोळंबे देसले मल्टिपल करून ही मार्क्स येणार नाहीत. जोवर तुम्ही संयुक्त पूर्व चे त्यावरील प्रश्न खूपदा वाचणार नाही तोवर या विषयाची धास्ती कमी होणार नाही. यात Answers चे अंदाज बांधता येणे आवश्यक बनले आहे.

5 ) राज्यशास्त्र: सरसकट सर्व topics आणि त्यांची तयारी संयुक्त पूर्व साठी गरजेचे नाही. एकूण दहा प्रश्न आणि चकवा देणारे असे असल्याने साधारण 2017 ते 2022 संयुक्त गट ब पूर्व परीक्षेत ज्या घटकावर प्रश्न विचारले गेले आहेत केवळ तेच घटक टार्गेट हवेत. मात्र असे आपण selective करत असल्याने त्यावर जबर पकड हवी. Laxmikant मधून तो टॉपिक, त्यावरील सर्व exams चे PYQ पाठ. फसवू शकणारे बारकावे याकडे लक्ष द्यावे लागेल. संपूर्ण राज्यशास्त्र करण्यास या उरलेल्या वेळात कठीण असते. केलेच तर प्रश्न सुटण्याची पूर्ण खात्री नसते. त्यासाठी अशी रणनीती ठेवता येईल.

6) विज्ञान आणि संयुक्त पूर्व मद्ये 55 प्लस जाणे यात एक संगती आहे. येथे पुन्हा PYQ च तूमचे काम हलके करू शकतात. आज अखेर संयुक्त साठी विचारलेल्या topics ची लिस्ट बनवून त्याचे PYQ नीट पक्के करणे आवश्यक आहे. याला दिवसाचा ठराविक वेळ द्यायला हवा. विज्ञान कच्चे असणारे किंवा प्रथमच करणाऱ्यांना हा विषय एकदम पूर्ण करता येणार नाही. मात्र रोज काही chapter’s करणे, नवीन करताना मागील Revision हे सूत्र पाळले तर यात मार्क्स मिळू शकतात. नव्याने बालभारती करून फायदा नसेल. Topics संपणे आणि वारंवार पाहण्यात राहणे हे सूत्र येथे खूप आवश्यक आहे.

7 ) गणित बुद्धिमापन : रोज एक तास याला द्यायला हवा. थेट पुस्तके वापरणे आवश्यक नाही. आयोगाचा मागील क्रमाने एक एक पेपर घेणे. ते 15 प्रश्न म्हणजे 15 topics असे मानणे. जे तुम्हाला सहज जमते त्याकडे कानाडोळा चालेल. पण जे जमणार नाही ते मित्र, व्हिडिओ किंवा इतर माध्यमातून समजून घेणे गरजेचे आहे. असे 2022 ते किमान 2017 पर्यंत मागे जाणे. यात आलेले topics मात्र सोडता कामा नयेत. त्यावर कमांड कशी घेता येईल याकडे लक्ष द्या.

मिथुन पवार
Project CHHAYA MPSC UPSC
WhatsApp: 9970841952

Scroll to Top