नमस्कार ,
अभ्यास करत असताना आपण सर्व जण सारखेच पुस्तक वाचतो , मनापासून अभ्यास करतो ..पण असं का होतं , की अभ्यास करून सुद्धा कमी मार्क्स येतात ? नेमकं चुकतं कुठं ? मग आपण काय करावं , जेणेकरून मार्क्स येतील ? असे असंख्य प्रश्न आहेत .आतापर्यंत मी ज्या परीक्षा दिल्या , त्यावरून मला काही गोष्टी निदर्शनास आल्या …त्या म्हणजे प्रत्येक वेळी आपण सारख्याच चुका करतो …किंवा सुधारणा करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात , त्या तेवढं लक्षपूर्वक करत नाही ….किंवा आपल्या अडचणी समजून घेऊन ,त्यात मार्ग दाखवायला कोणी नसते …तर मी एक सल्लागार म्हणून एक Personal mentorship program सुरू करायचा विचार केला आहे ज्यामध्ये येणाऱ्या राज्य सेवा मुख्य परिक्षा 2022 च्या तयारीदरम्यान येणार्या तुमच्या अडचणीवर आपण तोडगा काढून , मार्क्स कसे वाढतील …यावर काम करू ….
रेडीमेड मटेरीयल पेक्षा तुम्ही तुमच्या नोट्स कशा काढाव्यात, काय लक्षात ठेवायचे, काय नाही ? अशा तर्हेने अभ्यासाला दिशा देण्याचा प्रयत्न करेल …माझ्या अनुभवातून मी जितके आयोगाला समजुन घेतले ते वेळोवेळी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल…. पहिल्या प्रयत्न १६ रँक मिळवण्यासाठी अन् पुढच्या प्रयत्नात अजुन स्कोर वाढवण्यासाठी वेळोवेळी ज्या बारीकसारीक गोष्टींकडे मी लक्ष दिले ते वेळोवेळी आपल्याशी शेयर करेल यातुन आपला स्कोर वाढण्यासाठी निश्चितच मदत होईल , असा हा program असेल….मी काय अन् कसे करायचे सांगेल, प्रत्यक्षात करणार आपणच आहात…त्यामुळे पहिल्यांदा स्वतःवर अन् नंतर माझ्यावर विश्वास ठेवा…जे आतापर्यंत झाले नाही ते आता होईल, कारण तुम्ही जे आतापर्यंत केले नाही, ते आता आपण करणार आहोत…शेवटचा पहिला अन् शेवटचा प्रयत्न असे समजुनच तयारी चालु ठेवायची आहे.
काही शंका/अडचण असल्यास
@Shashikant_Babar या आयडी वर संपर्क साधा.इतर माहिती सविस्तर वैयक्तिक मॅसेज मध्ये सांगितली जाईल.
- _शशिकांत मारोती बाबर
- ( MPSC 2020, Rank16, सध्या Naib Tahasildar चे प्रशिक्षण चालू आहे ) MPSC 2021 Mains Score : 470
साभार _ @Umed_mpsc ( Telegram )