महाराष्ट्रातील संत – परिचय . स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने .

महाराष्ट्रातील संत थोडक्यात .

🚩 संत ज्ञानेश्वर महाराज.

संत ज्ञानेश्वरांचा जन्म जन्म इसवी सन १२७५ ते १२९६आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत व आईचे नाव रुक्मिणी असे होते .विठ्ठल पंतांचे मूळ घराणे पैठण जवळील आपेगाव हे होते. विठ्ठलपंतांना सर्व मिळून चार आपत्ती होतील निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई,  ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21 व्या वर्षी 1296 ला समाधी घेतली.  ज्ञानेश्वरांनी शके 1290 मध्ये ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टिका लिहिली याखेरीस अमृतानुभव चांगदेव 65 . अशी प्रपंचणा केली . ज्ञानेश्वर महाराजांनी अंतिम निष्ठा ज्ञानरूपी अशी होती व त्यांनी भागवत धर्माच्या झेंड्याखाली सर्वांना एकत्र आणले. ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना केली प्राध्यापक ग बा सरदार यांनी म्हटले आहे की ज्ञानेश्वर  महाराष्ट्रातील संत चळवळीचे धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते संत ज्ञानेश्वरांनी टीका सांगितले आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली . 

🚩 संत नामदेव महाराज. 

संत नामदेव महाराजांचा जन्म इसवी सन १२७० – १३५० मध्ये पंढरपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी व आईचे नाव गोणाबाई होते .नामदेव महाराजांचे जन्मगाव पंढरपूर की नरसी असा वाद आहे, परंतु नामदेव यांचे वडील हे नरसी गावचे होते व त्या नंतर ते पंढरपूर या ठिकाणी स्थायिक झाले. नामदेव महाराजांना बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाची ओढ होती इसवी सन १२९१ मध्ये ज्ञानेश्वर महाराज व नामदेवांची आळंदी येथे भेट झाली ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून नामदेव महाराज औंढा नागनाथ गेले व विसोबा-केचरांकडून ग्रुप देश घेतला.  नामदेवांनी ज्ञानेश्वर सावता माळी चोखामेळा इत्यादी समवेत तिर्थ यात्रा केली. नामदेव महाराजांनी उत्तर भारतातपर्यंत तीर्थयात्रा केली.  पंजाब मध्ये ते वीस वर्ष वास्तव्यास होते.  नामदेवांची हिंदी भाषेतील 125 पदे उपलब्ध आहेत त्यापैकी 61 पदे शिखांच्या ग्रंथसाहिबा ग्रंथात नामदेव जी की मुखबानी या नावाने आहेत. नामदेवांची गाथा हे ज्ञानेश्वर चरित्राचे एक महत्त्वाचे साधन असून ज्ञानेश्वरांचे समकालीन चरित्रकार म्हणून नामदेवांचा गौरव केला जातो.                                                                                                  संत बहिणाबाई नामदेवांची स्तुती करताना लिहितात ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया नामा तयाचा किंकर तेने केला विस्तार .

 

🚩 संत एकनाथ महाराज.

संत एकनाथ महाराजांचा जन्म इसवी सन  १५३३ – १५९९महाराष्ट्रात भागवत धर्माची ध्वजा फडकवण्यात ठेवण्याचे कार्य इसवी सनाच्या सोळाव्यादेशात संत एकनाथांनी केले.  संत एकनाथ यांचा जन्म पंधराशे चार पैठण येथे झाला.  संत एकनाथ महाराजांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी असे होते.  त्यांचे आई-वडील नसणे कारणाने त्यांच्या संगोपन त्यांच्या आजोबा ‘चक्रपाणी”यांनी केले.  नाथ महाराजांना लहानपणापासून हरिभक्तीची ओढ होती त्यांच्या परिणामी वयाच्या बारावी वर्षी ते देवघरात गेले आणि जनार्दन स्वामींच्या राहिले पुढे सहा वर्षाचा काळ लोटल्यानंतर नाथ महाराजांना सुलभ पर्वतावर सगवून सत्कार झाला.  ग्रंथ चतूश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत, भावार्थरामायण अशी ग्रंथ रचना केली. एकनाथी भागवत हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या एकादशकंदावरील टीका आहे व ओळी संख्या सुमारे 19000 इतकी आहे.  संत एकनाथांनी देवीला आव्हान करणारी बारा भारुडे लिहिली.  त्यानंतर त्यांनी आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला त्याचबरोबर त्यांनी ज्ञानेश्वरी ची संहिता शुद्ध केली .

🚩 संत तुकाराम महाराज 

 संत तुकाराम महाराजांचा  जन्म इसवी सन १६०८  – १६५० रोजी झाला. ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्याचा झगमगता कळस म्हणजे संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा जन्म १६०८ ( विकिपेडिया नुसार ) रोजी देहू या गावी झाला ( जिल्हा पुणे ) त्यांच्या वडिलांचे नाव बोल्ह्ओबा आईचे नाव कनकाई व पत्नीचे नाव आवडाबाई. हे होते त्यांचे कुळ मोरे यांचे असून आडनाव आंबीले होते व त्यांच्या घरात विठ्ठल भक्ती पूर्वीपासून  चालत आलेली होती. वयाच्या सतराव्या वर्षी तुकाराम महाराजांचे त्यांच्या वरील माता पित्याचे छत्र  हरवले. संत बहिणाबाई त्यांच्या कौतुकास्पद म्हणतात .                           संतकृपा झाली । इमारत फळा आली ।। ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ।।नामा तयाचा किंकर”। तेणें रचिलें तें आवार ।। तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ।। बहिणी म्हणे फडकती ध्वजा | निरूपणा केलें बोजा। 

🚩 संत रामदास स्वामी 

समर्थ रामदास स्वामींचा जन्म जन्म इसवी सन १608 – १६८१ मराठवाड्यातील जालना जिल्हा जांब या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत होते तर आईचे नाव राणूबाई होते. रामदासांचे मूळ नाव नारायण व आडनाव ठोसर होते. व घराणे कुलकर्णी यांचे होते. वयाच्या तेरावे वर्षी लग्न मंडपातून पलायन केले आणि ते अध्यात्माकडे वळले. नाशिक पंचवटीमध्ये टाकळी या ठिकाणी बारा वर्षे  तपासा केली व त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थ  यात्रा केली. त्यांनी बारा वर्षे यात्रा करून रामदास स्वामी  महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या किनारी ११ मारोती मंदिरांची स्थापन केली.  याच काळात त्यांनी चाफळ या ठिकाणी शक्य १६४८  मध्ये राम मंदिर उभारले. आयुष्याच्या अखेरच्या काळात रामदासांची वास्तव्य सजनगडावर होते. श्री राम हनुमान व तुळजाभवानी त्यांची आराध्य दैवत ही होती. 1681सज्जनगडावर त्यांना समाधी लागली. ग्रंथसंपदा – दासबोध, मनाचे श्लोक, करूनअष्टके, 21 समासी , दोन रामायन लिहिली . शिवरायांचे  आठवावे रूप शिवरायांचा आठवावा  प्रताप महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे संभाजी महाराजांना हा उपदेश रामदास स्वामीनी  दिला. प्रपंच करावा नेटका, हा  उद्देश रामदास स्वामींचा आहे .

 

अनुक्रमणिका

Scroll to Top