तलाठी भरती २०२४ - संपूर्ण मार्गदर्शन
🔺तलाठी होण्यासाठी काय करावे लागेल ?
- विभागाचे नाव – महसूल विभाग
- तलाठी पदे ही “गट – क” विभागातील पदे असतात.
- तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही.
- महसूल जमा करणे संबंधित रेकॉर्ड ठेवणे या साठी तलाठी महसूल विभाग अंतर्गत काम करतो.
- तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. त्यासाठी उमेदवार किमान पदवी उत्तीर्ण हवा.
- उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
- या अगोदर २०१९ या वर्षी परीक्षा झालेली होती त्यानंतर परिक्षारथी तलाठी भरती 2023 ची वाट पाहत आहेत. जाहिरात आलेली आहे फॉर्म लवकरच निघतील .
🔺तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते ?
- तलाठी पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी स्तराची आहे.
- कमीत कमी तुम्ही पदवीधर असणे गरजेचे आहे जास्तीत जास्त मर्यादा नाही.
🔺तलाठी पदासाठी परीक्षा पद्धत कशी असते / विषय संदर्भ ?
- ऐकच परीक्षा असते आणि लेखी स्वरूपात परीक्षा असते ( सद्या ऑनलाइन स्वरूपात होईल )
- परीक्षेसाठी विषय – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता हे विषय असतात.
- प्रत्येक विषयासाठी प्रश्न संख्या 25 असते. आणि प्रत्येक विषयाला 50 गुण असतात. तर
- एकूण 100 प्रश्न व 200 गुण असतात.
- मराठी विषयाचा स्तर वा दर्जा 12 वीचा असतो. इंग्रजी आणि बाकी विषय पदवी स्तर असतो.
- तलाठी भरतीची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. ( MCQ स्वरूपात )- वेळ 2 तास
- ( मागच्या वर्षी २०१९ जवळपास 165 कट ऑफ होता open , obc जवळपास बरोबर असतो )
मित्रांनो कोणतीही परीक्षा देण्या पूर्वी संबंधित अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत माहीत असंने गरजेच असत त्यामुळे हे माहीत होण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊ शकता . यापूर्वीची तलाठी भरती 2019 मध्ये झालेली होती त्या प्रश्न पत्रिका आपल्या साईट वर उपलब्ध आहेत तपासून पाहणे. प्रश विचारण्याची पद्धत बारकाईने तपासून पहा. घटक तपासा. त्याची व्याप्ती/मर्यादा लक्षात घ्या. सोबत तश्याच पद्धतीच्या आणखी प्रश्न पत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा .
आपल्या साईट वर सरावासाठी प्रश पत्रिका मोफत मध्ये उपलब्ध आहेत .
🔺तलाठी पदासाठी वय मर्यादा काय असते ?
- वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे.
- ( SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येते – जाहिराती मध्ये तश्या प्रकारची माहिती नमूद असते नियम अटी वेळोवेळो बदलतात जाहिरात तपासून घेणे महत्वाचे राहील )
🔺तलाठी पदाचा पगार किती असतो ?
- विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- वेतन श्रेणी – ९३०० – ३४८०० .रुपये प्रतिमहिना असतो
- ( संख्या जाहिराती नुसार आणि तेव्हाच्या वेतन धोरणानुसार बदलू शकते हे लक्षात घ्या )
🔺तलाठी पदासाठी अर्ज कसा करावा ?
- तलाठी भरती अर्ज प्रक्रिया आता ऑनलाइन स्वरूपात असते .
- अर्जदाराचे स्वत; च्या gmail account वरुण लॉगिन करावे फॉर्म सबमीट केल्या नंतर त्याच मेल वर माहिती मिळते .
- तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होते त्यात परीक्षा दिनांक नमूद असतो. अर्ज करण्याची
- सुरवातीची तारीख व शेवटची तारीख नमूद असते . त्या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचं असतो
- आणि लगेच परीक्षा केंद्र निवडायच असत. फिस तुम्ही चलणा द्वारे किंवा ऑनलाइन पध्दतिने भरू शकता.
- किमान कमाल जाहिराती पासून दोन ते तीन महिन्यांपर्यंत कालावधी मिळतो परीक्षे साठी .
- ( मागे पुढे होऊ शकत याची नौद घ्या. )
🔺तलाठी पदासाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे ?
- अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जाहिराती मध्ये नमूद असतात तरीसुद्धा खालीलप्रमाणे
- पदवी प्रमाणपत्र ( Degree Certificate )
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ( domacil )
- आधार कार्ड नंबर ( updated otp Varified )
- नोन क्रिमिनल ( Non Criminal )
- जवळचा कालावधीत काढलेला फोटो ( Colour )
🔺तलाठी पदासाठी पुस्तक कोणती वाचावी ?
➡️ मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे / मो रा वाळंबे . 📌
➡️ इंग्रजी व्याकरण – बाळासाहेब शिंदे / सचिन जाधवर 📌
➡️ अंकगणित बुद्धिमत्ता – सतीश वसे / पंढरीनाथ राणे , आरगुडे . 📌
➡️ सामान्य ज्ञान – तात्याचा ठोकळा / साईट वरील नोट्स . 📌
ऑनलाइन फॉर्म भरावा आणि संबंधित पावती/प्रिंट जपून ठेवावी. कारण कागद पत्र तपासणी वेळेस काही अडचण निर्माण झाल्यास तुम्ही फॉर्म भरल्याचा तो एकमेव ग्राह्य पुरावा असतो .
मित्रांनो सदरील माहिती ही मागच्या जाहिरातीं नुसार आणि इंटरनेट वरील माहिती वरुण घेतलेली आहे. या मध्ये जाहिराती नुसार अर्ज करण्याची पद्धत / पगारभत्ता / कागदपत्र यांची पूर्तता कमी जास्त असू शकते बाकी अभ्यासक्रमात कसलाही बदल अजून तरी झालेला नाही. जाहिरात येईल तेव्हा जाहिरात तपासावी, तीच माहिती अधिकृत असते. सदरील माहिती ही फक्त तलाठी पदाची संकल्पना स्पष्ट व्हावी या उद्देशाने प्रसारित करत आहे. .
तलाठी भरती मागील प्रश्न पत्रिका २०१९
🎯 मागील भरती ही २०१९ वर्षी तीन फेस मध्ये घेण्यात आली होती , त्यामध्ये सकाळ सत्र दुपार सत्र संध्याकाळ सत्र अक्षय पद्धतीने येणारी सुद्धा तश्यात प्रकारे असेल . काही प्रश्न पत्रिके मधील प्रश्न परत परत झालेले आहेत हे प्रश्नपत्रिका अभ्यासताना तुमच्या लक्षात येईल .. ( 2023 ची सुद्धा याच पद्धतीने घेण्यात आलेली होती )
तलाठी भरती पेपर २०१९ – दुपार सत्र
( पुढील पेपर पाहू शकता, आणखी पाहण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करावा .pdf साठी टेलेग्राम ग्रुप जॉइन करा )
१ . पुढील पानावर जाण्यासाठी pdf revieve ला क्लिक करा आणि खाली पर्याय दिलेला आहे ..
२ . वर सांगितल्या प्रमाणे पेपर हे सकाळ दुपार आणि सायंकाळ या सत्रामद्धे पेपर होते त्या प्रमाणे पेपर आहेत खाली जाऊन आणखी पाहू शकता .
३.पेपर या ठिकाणी टाकते वेळी थोडे मागेपुढे झाले आहेत ते तापासून पहावे . सकाळ सत्र एवजी दुपार सत्र पडला आहे ,
४. साईट चालत नसल्यास रीफ्रेश करून पहावी , पीडीएफ ओपन होईन टी तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता .
५. सराव करण्यासाठी अश्याच पद्धतीचे भरपूर सराव पेपर आपल्या साईट वर उपलब्ध आहेत , जास्तीत जास्त सराव करा .
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस १ , सकाळ सत्र
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस १ , दुपार सत्र
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस १ , सायंकाळ सत्र
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस २ , सकाळ सत्र
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस २ , दुपार सत्र
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस २ , सायंकाळ सत्र
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस ३ , सकाळ सत्र
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस ३ , दुपार सत्र
➡️ तलाठी भरती पेपर – २०१९ फेस ३ , सायंकाळ सत्र
तलाठी भरती संबंधित आणखी प्रश्नपत्रिका सोडवा. ➡️