MPSC Interview / राज्यसेवा मुलाखत ( मागील मुलाखती )

🟣 मुलाखतीस पेहराव कसा असावा ? 

यावर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भूमिका मांडत असतात. सूट – बूट – ब्लेझर वरही खूप बोलणे होते. त्यात पडायला नको. मी माझे एक दोन वैयक्तिक मते मांडतो.

1) पेहराव हा नक्कीच आपली विशिष्ट छाप पाडणारा मात्र स्वतःस comfort देईल असा असावा. तशी कपडे आवश्यतेनुसार घालण्याची सवय देखील असावी. थेट मलाखतीलाच विशिष्ट ड्रेस असे शक्यतो नको. 

2) कलर डार्क नक्कीच नसावा. अती फेंटच हवा असेही नको. काहीतरी वेगळे पणा म्हणून चेक्स, लायनिंग असाही प्रकार नको. हे नियम कोठे लिहिलेले नाहीत मात्र थोडे तारतम्य ठेवले तर कोणालाही समजून घेणे सोपे पडेल. हे खरे आहे की, white black pant किंवा blue/ soft pink आणि blue/black pant अशी कॉम्बिनेशन आता परवलीची बनली आहेत. हेच हवे असे अजिबात नाही.

3) शिरीष ला सकारात्मक कमेंट मिळाली म्हणजे असा फॉर्मल नसणारा यलो कोणीही घालून गेला तर तशीच कमेंट येईल असे नाही. कॉपी नकोच. तेच सत्य आहे. पण आपण मुलाखती पर्यंत पोहचतो तोवर अनेकदा आपल्या वेगवेगळया वेळी आजू बाजूच्या लोकांच्या शर्ट च्या विशिष्ट कलर ला चांगल्या compliments मिळतात. त्या मुद्दाम हुन अशा वेळी लक्षात घेणे आवश्यक वाटते. यापूर्वी ही एकदम गोरा वर्ण असणाऱ्यास ग्रे कलर शर्ट साठी अशीच कमेंट मिळाली होती. अर्थात हे पॅनल व त्यातील ती विशिष्ट व्यक्ती अशीही सापेक्षता आहे. हे समीकरण नाही. याचा गुण मिळण्यावर ही कितपत फायदा होतो ते ही निश्चित नसते. आपले आकलन , उत्तरे पण  पठडी बाज नकोत. तर impact मिळेल. 

4) आपली उंची, वर्ण, वजन, चेहरा ठेवण…. ही लिस्ट वाढेल. मुद्दा लक्षात घ्या.  अशा विविध घटकांचा प्रभाव ड्रेस selection वरती पडेल. अमुक एक तसे परिधान करतो म्हणून मी ही हे अंधानुकरण करतो जसे अभ्यास बाबतीत नको तसे या पेहरावात पण नको.

Originality पाहिजे, आचार, विचार, कृती यातच नव्हे तर पेहरावात ही..असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

( फक्त मुलांच्या बाबतीत बोललो. कारण तो स्वतः चा अनुभव आहे. Gender bias नाही. योग्य माहिती घेवून महिला ड्रेसिंग वर पण जमल्यास भाष्य करेन.)

साभार – मिथुन पवार ( Project CHHAYA MPSC / UPSC )

WhatsApp: 9970841952

( खाली दिलेल्या pdf माहितीसाठी तपासणे ) 

1 ) राज्यसेवा मुलाखत – भाग एक ( २०२२ )

२ ) राज्यसेवा मुलाखत – भाग दोन ( २०२२ )

३ ) राज्यसेवा मुलाखत – भाग तीन ( २०२३ )

४ ) पोलिस उप- निरीक्षक मुलाखत – भाग एक

५ ) पोलिस उप- निरीक्षक मुलाखत – भाग दोन

Scroll to Top